Pune : प्रा. डॉ. विजय देव यांचे दीर्घ आजाराने निधन

एमपीसी न्यूज- विद्यार्थीप्रिय प्राध्यापक अशी ओळख असणारे डॉ. विजय देव यांचे पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. देव यांच्या पश्चात पत्नी लेखिका डॉ. वीणा देव, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व मधुरा या दोन कन्या असा परिवार आहे. सुप्रसिद्ध लेखक गो.नी. दांडेकर यांचे ते जावई होते.

त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आज सकाळी १० वाजता घरी ठेवण्यात येईल. ११ वाजता त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.