Vadgaon Maval : भूषण मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज- लायन्स क्लब ऑफ पुना यांच्या सहकार्याने आणि ला.नसरीन एजनेर यांच्या समन्वयाने भूषण मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी शिबिर तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.12 ) सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जैन स्थानक, पोटोबा मंदिरासमोर, वडगाव मावळ येथे हे शिबिर होणार आहे.

आजच्या धावपळीच्या युगात स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर होण्याचे प्रमाण फार वाढत चालले आहे , दररोजच्या कामाच्या व्यापामध्ये त्यांचे त्यांच्या आजाराकडे दुर्लक्ष होत असते. म्हणूनच रोगापेक्षा प्रतिबंध बरा या उक्तीप्रमाणे लायन्स क्लब ऑफ पुना यांच्या सहकार्याने आणि ला.नसरीन एजनेर यांच्या समन्वयाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

11 एप्रिल पर्यंत नांवनोंदणी करणाऱ्या पहिल्या 100 महिला भगिनींनाच या शिबिरात सहभागी होता येईल. या शिबिरात फक्त 10 मिनिटांत आपली तपासणी होऊन महिलांना रिपोर्ट मिळेल. या शिबिराचा जास्तीतजास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सर्व हॉस्पिटलला रक्ताची खूप गरज भासते आणि त्या तुलनेत गरजू रुग्णांना रक्त पुरवठा कमी होत असतो म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून याच ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे शिबिर होणार असून प्रत्येक रक्तदात्यास मोबाईल सहअनेक उपकरणांना उपयुक्त अशी नामवंत कंपनीची पॉवर बँक भेट दिली जाणार आहे . त्याच सोबत रक्तदान प्रमाणपत्र आणि मोफत रक्त पिशवीचे एक कुपन देखील भेट दिले जाणार आहे. या शिबिरासाठी मावळ विचार मंच , मावळ फेस्टीवल, जैन सकल संघ, स्मित कला रंजन, सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , सामाजिक संस्था , व्यायामशाळा आणि मित्र परिवार यांनी विशेष सहकार्य केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.