Pimpri : इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा अमृत दोन अभियानामध्ये  समावेश

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदी प्रदूषणावर उपाययोजना ( Pimpri ) करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असून, केंद्र सरकारच्या अमृत-2 अभियानामध्ये इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत 526 कोटी रुपयांची निधी उपलब्ध होणार असून, राज्यस्तरीय सुकाणू समितीच्या शिफारसीनुसार कार्यवाही करावी, अशा सूचना राज्याच्या नगरविकास विभागाने दिल्या आहेत.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर इंद्रायणी नदी प्रदूषणाचा विषय चर्चेत आला.  ऑक्टोबर 2022 मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र आळंदी येथे दौरा केला होता. त्यानंतर दोन दिवसात राज्य उच्चाधिकार समितीची बैठक झाली. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे प्रदेश महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांनी सादर केलेल्या ‘डीपीआर’ला तत्वता: मान्यता देण्यात आली. तसा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे.

Lonikand : बिबट्याचा 5 वर्षाच्या मुलीवर हल्ला; मुलीला ससून रुग्णालयात करण्यात आले दाखल

तसेच, राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने केंद्र सरकार पुरस्कृत अमृत-2.0 योजनेतील राज्य जलकृती आराखडा तयार केला. त्यामध्ये इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा समावेश केला असून, 526 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.

सदर प्रस्ताव केंद्र शासनाच्या शिखर समितीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. तसेच, या प्रकल्पासाठी महराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक मान्यता घेवून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन शासनास सादर करावे, असे आदेश नगर विकास मंत्रालयाने महापालिका प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे निविदा पूर्व प्रक्रियेला गती मिळाली आहे.

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पासाठी 2014 पासून राज्य सरकार, महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. 2017 मध्ये महापालिकेत भाजपाची सत्ता आली. त्यावेळी या प्रकल्पाला गती देण्याची भूमिका घेतली. 2019 मध्ये राज्यात सत्ताबदल झाला. त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा लांबणीवर पडला. आता राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार आहे.

त्यामुळे नदी सुधार प्रकल्पाला चालना द्यावी, अशी ठाम भूमिका हिवाळी अधिवेशनात मांडली. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला. अमृत-2 च्या माध्यमातून नदी सुधार प्रकल्पाला निधी उपलब्ध होईल. पर्यावरण ना हरकत दाखला आणि केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी आम्ही शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहोत, असे आमदार लांडगे यांनी ( Pimpri ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.