Pimpri : केंद्र सरकारच्या निगरानी समितीवर अविनाश वाघमारे यांची निवड

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालयांतर्गत येणाऱ्या ( Pimpri)  केंद्रीय निगरानी समितीच्या पिंपरी-चिंचवड समन्वयकपदी अविनाश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय निगरानी समितीचे सदस्य रवींद्र प्रधान यांनी वाघमारे यांना निवडीचे पत्र दिले आहे.

केंद्र सरकारची सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय अनुसूचित जाती व जमाती, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांसाठी देशभर विविध योजना राबविते. तसेच या घटकांच्या सक्षमीकरणासाठी काम करते. अशा या मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या केंद्रीय निगरानी समितीच्या पिंपरी-चिंचवड समन्वयकपदी काळेवाडी येथील अविनाश वाघमारे यांची निवड करण्यात आली आहे.

Pimpri : इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाचा अमृत दोन अभियानामध्ये  समावेश

निवडीबद्दल  अविनाश वाघमारे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. अविनाश वाघमारे हे गेल्या अनेक वर्षांपासून शहरात सामाजिक काम करतात. त्यांनी विविध कामांसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून शहरातील अनेक नागरिकांची कामे केली आहेत. त्यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या पिंपरी विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केले आहे. त्या माध्यमातून त्यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील शेकडो नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.

आता त्यांना केंद्र सरकारच्या समितीवर काम करण्याची संधी मिळाली आहे. मिळालेल्या पदाचा वापर शहरातील अनुसूचित जाती व जमाती, दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी करणारा असल्याचे अविनाश वाघमारे यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालयांतर्गत गोरगरीब नागरिकांनी अनेक योजना राबविल्या जातात. त्याबाबत शहरातील नागरिक अनभिज्ञ आहेत. आता मी पदाच्या माध्यमातून केंद्राच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही अविनाश वाघमारे यांनी ( Pimpri) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.