Pimpri : पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ, पालिकेचे सोसायट्यांना पत्र 

पवना धरणात किती पाणीसाठा?

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या  विविध भागातून (Pimpri) पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये वाढ होऊ लागली आहे. सोसाट्यांमध्ये अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. पालिकेकडून मानांकानुसार पाणी पुरवठा होत असल्याचे  सोसाट्यांना पत्र पाठवून सांगण्यात येते. तसेच पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान, पवना धरणात 51.90 टक्के पाणीसाठा असून हा साठा जूनअखेरपर्यंत पुरेल.

पवना धरणातून 510, आंद्रा धरणातून पहिल्या टप्प्यात 75 तर एमआयडीसीकडून 20 असे 605 एमएलडी पाणी शहराला देण्यात येते. मात्र, आंद्रा धरणातून येणारे पाणी कमी झाल्याने चिखली, च-होली, मोशी, डुडुळगाव, भोसरी, दिघीसह आदी परिसरातून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने एमआयडीसीकडून अतिरिक्त 10 एमएलडी पाणी वाढविले आहे.

शहरात 331 मोठ्या सोसायट्या आहेत. यामध्ये 284 सोसाट्यांमध्ये सांडपाणी प्रकल्प सुरू असून 47 सोसाट्यांमध्ये (Pimpri) सांडपाणी प्रकल्पच बंद असल्याचे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केलेल्या पाहणीत नुकतेच आढळून आले. त्यामुळे काही सोसाट्यांमध्ये पाण्याची मोठी समस्या आतापासूनच निर्माण होऊ लागली आहे. अशाच मोठ्या सोसाट्यांमधून अपुरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने अशा सोसाट्यांना पत्र पाठविण्यास सुरूवात केली आहे.

आपल्या सोसायटींमधून पाण्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत. मात्र, आम्ही ठरलेल्या मानांकानुसार सोसायटीला पाणी पुरवठा करत आहोत. याबाबतचा गेल्या 10 ते 12 दिवसातील मीटर रिडिंगचा तक्ताही संबंधित सोसायटीच्या पदाधिका-यांना पाठविण्यात येत आहे. तसेच सोसायटीमधील भूमिगत टाक्या व टेरेसवरील टाक्यांची गळतीबाबत पाहणी करून योग्य ती खबरदारी घ्यावी. पाण्याचा काटकसरीने वापर करावा. सोसायटी अंतर्गत असलेल्या सांडपाणी प्रकल्प सुरू ठेवावेत. बोअरवेलचे पाणी स्वच्छतागृहे, उद्यान व इतर कामासाठी वापरावे. सोसायटी स्तरावर पाणी काटकसरीने व जपून वापरण्याबाबत  सोसायटी सभासदांमध्ये जागरुकता करावी, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले (Pimpri) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.