Pimpri : औद्योगिक क्रीडा संघटनेची टी- ट्वेंटी स्पर्धा; टाटा मोटर्स “अ” आणि टाटा मोटर्स “सी” संघाची सरशी

एमपीसी न्यूज – औद्योगिक क्रीडा संघटनेच्या 60 व्या टी- 20 क्रिकेट स्पर्धेचा (Pimpri)आज मंगळवार दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी टाटा मोटर्सच्या मैदानावर टाटा मोटर्स “अ” व महेंद्र अँड महेंद्र,चाकण यांच्या सामन्याने प्रारंभ झाला.

या स्पर्धेमध्ये एकूण 32 संघांनी भाग घेतलेला असून यामध्ये टाटा मोटर्स,बजाज ऑटो,महेंद्र अँड महिंद्रा,एसकेएफ,ॲम्यूनेशन फॅक्टरी आदी संघांनी भाग घेतलेला आहे. ही स्पर्धा “लीग कम नॉकआऊट” पद्धतीने होणार असून स्पर्धेचे उद्घाटन टाटा मोटर्स नितीन कदम(सिनियर मॅनेजर,एचआर) व औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर यांच्या हस्ते झाले.

Indrayni River Polution : इंद्रायणी नदी प्रदूषणाचा गंभीर दुष्परिणाम; केळगावात अशुद्ध पाणीपुरवठा

या प्रसंगी राजेंद्र नागेशकर म्हणाले की, यावर्षीही या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.सर्व खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यासाठी ही स्पर्धा एक उत्तम व्यासपीठ आहे.त्याचा सर्वांनी फायदा घ्यावा.

या समारंभाचे प्रास्ताविक प्रदिप वाघ यांनी,सूत्रसंचालन प्रवीण तांबे यांनी व आभारप्रदर्शन हरी देशपांडे यांनी केले.या प्रसंगी औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम,विजय हिंगे यांच्या सोबत सागर भोसले,पवन(आप्पा) जाधव,सुभाष नायर(जीएम,एचआर,डिमॅक),सतीश बेंद्रे(डिमॅक),स्नेहलकुमार कासार(एचआर,डिमॅक),विजय यादव(जीएम एचआर,केएसबी) हेही उपस्थित होते.• सकाळच्या सत्रात टाटा मोटर्स “ए”ने पहिली फलंदाजी करताना 20 षटकात वेगवान फलंदाजी करून 4 बाद 221 धावांचा डोंगर उभा केला.त्यांच्या प्रवीण कांबळे यांनी 56 चेंडूत 6 चौकार व 2षटकारांच्या साह्याने 80 धावा तर पंकज वाघचौरेने 30 चेंडूत 59 धावा करताना 6 चौकार व 4 षटकार मारले.

महेंद्र अँड महेंद्र कडून राहुल देशमुख,राजाराम पाटील,सुरज व भरत पवार यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

नंतर फलंदाजी करताना महेंद्र अँड महेंद्रच्या फैजल तांबोळी 3 चौकार व 2षटकारांच्या साह्याने 43 धावा व सागर बालपुरी याने 16 चेंडूत वेगवान 30धावा करताना 4 चौकार व 1 षटकार मारला व महिंद्र अँड महिंद्रच्या आशा पल्लवीत ठेवल्या. पण सुशील बेंद्रे 21/2सदानंद खरात 30/2 यांनी महेंद्र अँड महेंद्रची स्थिती 7 बाद 138 अशी केली. यानंतर महेंद्र अँड महेंद्रचा संघ फक्त 8 बाद 158 धावा करू शकला व टाटा मोटर्स “ए” संघ 63 धावांनी विजयी झाला.

• दुपारच्या सत्रात अत्यंत चुरशीने झालेल्या सामन्यात टाटा मोटर्स “सी” संघाने टाटा मोटर्स “बी” संघावर अवघ्या 13 धावांनी विजय मिळविला

टाटा मोटर्स “सी” संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 135 धावा केल्या. त्यांच्या सलामीच्या विजय तुपे 22 व जुबेर 29 धावा यांनी 57 धावांची भागीदारी केली.त्यानंतर मात्र त्यांचे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत.संतोष बाबर 27 व सचिन नलावडे 26 यांनी मधल्या फळीत थोडी लढत दिली.टाटा मोटर्स “बी” संघाचे कैलास डांगे 17 धावात 2 बळी व सुरेश भोसले 23 धावात 3 बळी घेतले.

नंतर फलंदाजी करताना टाटा मोटर्स “बी” संघाचे सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावर तानाजी माने 34 चेंडूत 5 चौकारांसह 38 धावा व अभिनंदन त्रिभुवन यांनी 21 चेंडूत 2 षटकार 5 चौकारांसह 40 धावा असा प्रतिकार केला पण टाटा मोटर्स “बी” संघ फक्त 122 धावांची मजल मारू शकला.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.