Pimpri : महाराष्ट्राचा महासंकल्प, पुणे रिअल इस्टेट काँक्लेव परिसंवाद

एमपीसी न्यूज – वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड (Pimpri) तर्फे पुण्यातील पंडित फार्म व बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे दोन दिवसीय वरद प्रॉपर्टी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाचा समारोप रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडीत परिसंवादाने करण्यात आला.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर यांनी प्रदर्शनास भेट देऊन सहभागी झालेल्या व्यावसायिकांशी संवाद साधला. वेगाने विस्तारणाऱ्या पुणे जिल्हयाच्या सर्वांगीण प्रगतीत गृहनिर्माण क्षेत्राचे योगदान मोठे आहे.

त्यामुळेच गृहनिर्माण क्षेत्राची पुढील वाटचाल, आव्हानं, दिशा, पुणेकर नागरिकांची सुरक्षितता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, कचरा समस्या, प्रदूषण, पुणे शहर विकास, भावी विकास, पुनर्विकास प्रकल्प अशा विविध विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली.

Pune : सहाव्या रोलबॉल आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महिला गटात केनिया संघाला विजेतेपद

या चर्चेमधे महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी आमदार व भाजप राष्ट्रिय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक वसंत मोरे, नरेडको माहि व्यवस्थापकीय संचालक, एसएसपीएल ग्रुप च्या उपाध्यक्षा, स्मिता पाटील, ख्यातनाम वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद आडकर, पिनाक कन्सल्टिंग प्रा. लि. चे संचालक आणि प्रथितयश आर्किटेक्ट (Pimpri) दिनेश वसंत चंद्रात्रे आणि वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक व आयोजक महेश कुंटे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.