Pimpri : मोक्का गुन्हयातील पसार झालेल्या आरोपीला बेड्या; बेकायदेशीर पिस्तूलही जप्त

एमपीसी न्यूज – मागील वर्षी गणेश विसर्जन मिरवणुकीत (Pimpri )एकाच्या डोक्याला पिस्तूल लाऊन जिवे मारण्याचा प्रयत्न करून पळून गेलेल्या आरोपीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने अटक केली.

 

त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. या आरोपीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायद्यानुसार (मकोका) देखील कारवाई केली होती.

जतिन उर्फ सोनू बिपीन टाक (वय 29, रा. सुभाषनगर, रिव्हररोड झुलेलाल मंदीरजवळ पिंपरी)(Pimpri ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Moshi : पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुलाच्या कामासाठी  जमीन सपाटीकरणाला सुरूवात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, एक तरुण पिस्तूल घेऊन फिरत आहे. त्याच्यावर मोकाची कारवाई झाली असून त्यात तो फरार आरोपी आहे. त्यानुसार पोलिसांनी पिंपरी परिसरात सापळा लाऊन रिव्हर रोड येथून जतिन टाक याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला लावलेले एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

जतिन टाक हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, जबरीचोरी, मारामारी, आर्म अॅक्ट, दुहेरी मोक्का असे गंभीर स्वरुपाचे 16 गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी त्याने एका व्यक्तीच्या डोक्याला पिस्तूल लाऊन त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर तो पळून गेला होता.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.