Pune : पुणे-मिरज रेल्वे मार्गावर दुहेरीकरणाच्या कामासाठी ट्रॅफिक ब्लॉक; कोयनासह अनेक गाड्या रद्द

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे-मिरज रेल्वे (Pune) मार्गावर तारगाव-मसूर-शिरवडे सेक्शन मध्ये रेल्वे ट्रॅक दुहेरीकरण आणि विविध अभियांत्रिकी, सिग्नालिंग दूरसंचार कामांसाठी 22 फेब्रुवारी पर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर – मुंबई कोयना एक्सप्रेस, कोल्हापूर – पुणे या गाड्या तीन ते चार दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. इतर गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील परिणाम होणार आहे.

20 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरु होणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 01024 कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस

21 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरु होणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्रमांक 01024 कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस
गाडी क्रमांक 01023 पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस

22 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरु होणाऱ्या रद्द करण्यात आलेल्या गाड्या
गाडी क्र. 11030 कोल्हापूर-मुंबई कोयना एक्सप्रेस
गाडी क्र.11029 मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस

23 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरु होणारी रद्द करण्यात आलेली गाडी
गाडी क्रमांक 01023 पुणे-कोल्हापूर एक्सप्रेस

गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन/शॉर्ट ओरिजिनेशन (Pune)

दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सुटणारी डेमू क्रमांक 01542 कोल्हापूर-सातारा या गाडीचा प्रवास कराड येथे संपेल. म्हणजेच ही गाडी कराड-सातारा दरम्यान रद्द राहील.

दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सुटणारी डेमू क्रमांक 01541 सातारा-कोल्हापूरचा प्रवास कराड येथून सुरू होईल. म्हणजेच ही गाडी सातारा-कराड दरम्यान रद्द राहील.

दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11425 पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेसचा प्रवास सातारा येथे संपेल. म्हणजेच ही गाडी सातारा-कोल्हापूर दरम्यान रद्द राहील.

दिनांक 21 आणि 22 फेब्रुवारी रोजी सुटणारी गाडी क्रमांक 11426 कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस सातारा येथून पुणे करीता सोडण्यात येईल. म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-सातारा दरम्यान रद्द राहील.

दिनांक 21 फेब्रुवारी रोजी गोंदिया येथून सुटणारी गाडी क्रमांक 11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसचा प्रवास पुण्यात संपेल. म्हणजेच ही गाडी पुणे-कोल्हापूर दरम्यान रद्द राहील.

दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रोजी कोल्हापूर येथून सुटणारी गाडी क्रमांक 11039 कोल्हापूर – गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस पुणे येथून सुटेल. म्हणजेच ही गाडी कोल्हापूर-पुणे दरम्यान रद्द राहील.

परिवर्तित मार्गावरून जाणाऱ्या गाड्या

दिनांक 21 फेब्रुवारी रोजी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक 12630 हजरत निजामुद्दीन- यशवंतपूर एक्सप्रेस दौंड-कुर्डुवाडी-पंढरपूर-मिरज या वळवलेल्या मार्गाने धावेल आणि ही गाडी पुण्याला येणार नाही.

दिनांक 21 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूहून सुटणारी गाडी क्र. 16505 बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस मिरज- पंढरपूर- कुर्डुवाडी- दौंड- पुणे या वळवलेल्या मार्गावर धावेल आणि ही गाडी सांगली, कराड आणि सातारा येथे येणार नाही.

एका गाडीच्या सुटण्याच्या वेळापत्रकात बदल

दिनांक 17 फेब्रुवारी आणि दिनांक 18 फेब्रुवारी रोजी कोल्हापूरहून सुटणारी गाडी क्रमांक 11030 कोल्हापूर -मुंबई कोयना एक्स्प्रेस कोल्हापूर येथून नियमित सुटण्याची वेळ 08.15 ऐवजी 10.15 वाजता अर्थात दोन तास उशिराने सुटेल.

सेक्शन मध्ये काही गाड्या रेग्युलेट करण्यात येतील

दिनांक 16 फेब्रुवारी रोजी म्हैसूरहून सुटणारी गाडी क्रमांक 12781 म्हैसूर-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस सेक्शन मध्ये एक तास तीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली जाईल.

Pimpri:दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची ‘एलके’ नवीन मालिका

दिनांक 18 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूहून सुटणारी गाडी क्रमांक 16534 बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस सेक्शन मध्ये एक तास पंचवीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली जाईल.

दिनांक 19 फेब्रुवारी रोजी पुण्याहून सुटणारी गाडी क्रमांक 11425 पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस सेक्शन मध्ये एक तासासाठी रेग्युलेट केली जाईल.

दिनांक 19 फेब्रुवारी रोजी बेंगळुरूहून सुटणारी गाडी क्रमांक 16508 बेंगळुरू-जोधपूर एक्सप्रेस सेक्शन मध्ये एक तास पंचेचाळीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली जाईल.

दिनांक 20 फेब्रुवारी रोजी मिरजहून सुटणारी गाडी क्रमांक 01424 मिरज-पुणे विशेष विभागात तीस मिनिटांसाठी रेग्युलेट केली जाईल.

दिनांक 21 फेब्रुवारी रोजी हजरत निजामुद्दीन येथून सुटणारी गाडी क्रमांक 12780 हजरत निजामुद्दीन – वास्को गोवा एक्सप्रेस विभागात दोन तासांसाठी रेग्यूलेट केली जाईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.