Pimpri : रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘मासक्युटो अबेटमेंट’ समिती

एमपीसी न्यूज –  सर्दी, खोकला यासारख्या आजारांचे प्रमाण वाढत (Pimpri) आहे. पावसाचे पाणी साचून, त्यावर डासांची उत्पत्ती झाल्याने डेंगी, चिकन गुनियासारख्या रोगांना निमंत्रण मिळू शकते. या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने तयारी केली आहे. त्यासाठी शहरात मासक्युटो अबेटमेंट समितीची स्थापना केलेली आहे.

डेंगी व चिकन गुनियाचा प्रसार करणाऱ्या डासांची मादी स्वच्छ पाण्यावर अंडे घालते. त्यामुळे घरातील पाणी साठविण्याची भांडी आठवड्यातून किमान एकदा रिकामी करून साफ करून भरावीत. पाण्याच्या मोठ्या टाक्या झाकणाने घट्ट बंद कराव्यात. घरातील फ्लॉवर पॉट, कुलर, फ्रिजच्या खालचे ट्रे हे देखील आठवड्याला रिकामे करावेत.

घराच्या गच्चीवर अथवा बाल्कनीमध्ये कोणतेही भंगार साचू देऊ नये. तसेच घराच्या आजूबाजूला पाण्याची असतील तर ती डबकी बुजवावीत, असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

Maharashtra News : धनगर समाजाच्या आरक्षणावरील सुनावणी ऑगस्ट पर्यंत तहकूब

ताप, अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी याबरोबरच उलट्या होणे, भूक मंद होणे, घशाला कोरड पडणे, पोट दुखणे ही डेंगीची लक्षणे आहेत. तर कमी अवधीचा तीव्र ताप, सांधेदुखीबरोबरच अंगावर पुरळ येणे ही चिकनगुनियाची लक्षणे आहेत. यातील कोणतीही लक्षणे आढळल्यास महापालिकेच्या दवाखान्यातून वैद्यकीय सल्ला घ्यावा.

डासोत्पती होणारी स्थाने नष्ट करण्यासाठी घरांचे कंटेनर सर्वेक्षण, व्यवसायांच्या (Pimpri) ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. महापालिकेची आठ रुग्णालये व दवाखाने या ठिकाणी डेंगीच्या तपासणीसाठी आवश्‍यक रॅपिड किट उपलब्ध करून देण्यात आले आहे.

चिकनगुनिया अथवा डेंगीची लक्षणे असलेल्या रुग्णाच्या वास्तव्याच्या ठिकाणी डासांच्या उत्त्पत्तीला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.