Pimpri Corona Update: शहरात नवीन 49 रुग्णांची नोंद, 47 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 49 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

शहरातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 513 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 77 हजार 771 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 339 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 133 रुग्ण गृहविलगीकरणात असून 206 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 24 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 254 आहेत. आज दिवसभरात 20 हजार 663 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 27 लाख 7 हजार 515 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.