Pimpri News : चऱ्होली येथे किरकोळ कारणावरून दाम्पत्याला मारहाण

एमपीसी न्यूज – घरासमोरून गेले या किरकोळ कारणावरून पती-पत्नीने मिळून दाम्पत्याला घरात घुसून मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. 30) रात्री चऱ्होली बुद्रुक (Pimpri News )येथे घडली.

अभिषेक संजय त्रिवेदी (वय 31, रा. चऱ्होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी (Pimpri News )पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पंकज मालोकर (वय 40) आणि त्याची पत्नी (वय 35) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri News : कुरळीतून 43 लाख रुपयांचा गुटखा जप्त, दरोडा विरोधी पथकाची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्रिवेदी त्यांच्या घराजवळील बोळातून जात असताना आरोपी महिलेने त्यांना शिवीगाळ केली. पंकज याने फिर्यादीस घरात घुसून मारहाण केली. आरोपी महिलेने फिर्यादींच्या पत्नीस मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास दिघी पोलीस करीत (Pimpri News) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.