Pimpri News : भाजप नेत्या पंकजा मुंडे, महेश लांडगे पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज – ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी पिंपरी चौकात चक्काजाम आंदोलन करताना माजी मंत्री, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपतर्फे आज (शनिवारी) राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. पिंपरीतही चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या राष्ट्रीय सचिव मुंडे सहभागी झाल्या होत्या. तसेच भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत.

पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी आंदोलन सुरू झाले. “राज्य शासनाची खेळी, ओबीसी आरक्षणाचा बळी”… ओबीसी के सन्मान मे, भाजप मैदान मे”, “ऊठ ओबीसी जागा हो, एकजुटीचा धागा हो” , निर्वाचित निवडणूक निरस्त करून ओबीसी संपवायचा राजकीय डाव?, असे फलक हातामध्ये घेऊन कार्यकर्ते मोठा संख्येने सहभागी झाले होते.

या आंदोलनात कोरोनाच्या नियमाचे कार्यकर्त्यांनी उल्लंघन केले. सुरक्षित अंतराचे पालन केले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.