Chakan Crime News : लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक, पाच महिलांची सुटका

एमपीसी न्यूज – लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवणा-या दोघांना चाकण पोलिसांनी अटक केली, तसेच पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली. शुक्रवारी (दि.25) चाकण येथील साईदीप हॉटेल ॲन्ड लॉज याठिकाणी हा प्रकार उघडकीस आला.

शहाजी देवीदास शिंगाडे (वय 31, रा. कुरुळे, खेड, पुणे मुळगाव – सोलापूर) व नवनाथ मधुकर निकम (वय 25, रा. कुरुळे, खेड, पुणे मुळगाव-लातूर) , अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, जगन्नाथ शंकर करटे (वय 74, रा. चिंचवड स्टेशन) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्थिक फायद्यासाठी लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवत होते. चाकण पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून पाच पीडित महिलांची सुटका केली तसेच, 24 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक यमगर अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.