Chinchwad News : शाहू महाराज यांनी शिक्षणावर 53 टक्के रक्कमेची तरतूद करून आदर्श निर्माण केला : ॲड. लक्ष्मण रानवडे

एमपीसीन्यूज : आरक्षणाचे जनक असलेल्या राजर्षि शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये राज्याच्या एकूण उत्पन्नातील 53 टक्के रक्कमेची तरतूद शिक्षणासाठी करून आदर्श निर्माण केला होता, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष ॲड. लक्ष्मण रानवडे यांनी आज, शनिवारी केले.

मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, लहुजी वस्ताद प्रतिष्ठान व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संघ यांच्यावतीने राजर्षि शाहू महाराज जयंतीनिमित्त शाहूनगर, केएसबी चौकातील त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी ॲड. रानवडे बोलत होते.

मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते अशोक सातपुते, प्रवीण कदम, सचिन दाभाडे, राजू आवळे, सुधीर कांबळे, स्मिता म्हस्कर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.