Pimpri News : सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील – आयुक्त पाटील

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराला राहण्यायोग्य सर्वोत्तम शहर बनविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे, आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.

सिम्बायोसिस स्किल्स अॅड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे स्कूल ऑफ आर्किटेक्चर अर्थन डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंगच्या विद्यार्थ्यांनी ‘माय सिटी यू माय लेन्स’ या विद्यार्थ्यांसाठी एक राष्ट्रीय ई-कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्यावेळी आयुक्त राजेश पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहराला सर्वोत्तम शहरांपैकी एक शहर बनविण्यासाठी महापलिका राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच शहराला उत्तम शहर बनविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहनही  त्यांनी केले.

कान्फरन्सद्वारे विद्यार्थ्यांना त्यांचे विचार, छायाचित्रे आणि साहित्याद्वारे, त्यांची शहरे आणि परिसर व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ प्रास झाले. परिषदेची कार्यवाही ISBN क्रमांकासह प्रकाशित करण्यात आली. उद्घाटन समारंभामध्ये कुलपती एस. बी. मुजुमदार यांनी कार्यक्रमाला संबोधित केले आणि कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी विद्यापीठाबद्दल संक्षिस पार्श्वभूमी प्रदान केली. संचालक डॉ. गौरी शिरकर यांनी स्वागत केले. आभार ऋतुजा जगताप यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.