Pimpri News : भारतीय राष्ट्रध्वजाचा ‘मास्क’ विकणाऱ्या ई-कॉमर्स कंपनीवर कारवाईची मागणी

एमपीसी न्यूज – ‘रेड-बबल’ ही ई-कॉमर्स कंपनी त्यांच्या संकेतस्थळावरून राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या ‘मास्क’ची विक्री करत आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी या कंपनीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सुराज्य अभियानच्या वतीने करण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी ही मागणी केली आहे. ‘भारतीय राष्ट्रध्वज’ हा कोट्यवधी भारतीयांसाठी अस्मितेचा विषय आहे. काही अपवाद वगळता त्याचा अन्य कोणत्याही गोष्टींसाठी वापर करणे कायद्याने दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे.

‘रेड-बबल’ ही ई-कॉमर्स कंपनी राष्ट्रध्वजाप्रमाणे बनवलेल्या ‘मास्क’ची विक्री करत आहे. त्यामुळे या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी. तसेच, त्याची होणारी विक्री देखील थांबवावी अशी मागणी या निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.