Pimpri News : मेणबत्ती आणि दिव्यांच्या आकर्षक रोषणाईत उजळला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर

एमपीसी न्यूज – महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरीतील पूर्णाकृती पुतळ्यासभोवती मेणबत्ती आणि विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईमुळे सभोवताल उजळून निघाला असून, बाबासाहेबांच्या अनुयायांनी अनोख्या पद्धतीने त्यांना अभिवादन केले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्या ( रविवारी ) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. यानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन म्हणून त्यांच्या अनुयायांनी पिंपरीतील बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यासभोवती मेणबत्ती आणि विद्युत दिव्यांची रोषणाई केली आहे. रोषणाईने परिसर उजळला असून, आकर्षक दिसत आहे.

दरवर्षी 6 डिसेंबरला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी लाखोंच्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केलं आहे. अभिवादन करण्यासाठी प्रत्यक्ष चैत्यभूमीवर न येता आपापल्या घरीच बाबासाहेबांना अभिवादन करा, असे आवाहन अनुयायांना करण्यात आलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.