Pimpri News: नवयुग श्रावणी काव्यस्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज: नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाने विनाशुल्क श्रावणी काव्यस्पर्धेचे आयोजन केले आहे. काव्यस्पर्धेचे हे एकोणतिसावे वर्ष आहे.(Pimpri News) या काव्यस्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कविता पाठविण्याची अंतिम मुदत बुधवार दि.27 जुलै 2022 आहे.

 

या स्पर्धा काव्यलेखन आणि सादरीकरण या दोन स्तरांमध्ये घेण्यात येते आहेत. कवितेसाठी विषयाचे बंधन नाही. कविता किमान बारा आणि कमाल वीस ओळींपर्यंत असावी. (Pimpri News) ‘श्रावणी काव्यस्पर्धेसाठी’ असा उल्लेख करून कवितेचे शीर्षक, कविता, कवीचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहावा. कविता राजकीय, सामाजिक, धार्मिक अथवा जातीय तेढ निर्माण करणारी नसावी. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क नाही. काव्यस्पर्धा शनिवारी (दि. 20) ऑगस्ट 2022 रोजी दुपारी तीन वाजता पिंपरी-चिंचवड परिसरात आयोजित केली जाणार आहे.

 

Nigdi : अतिरिक्त आयुक्तांकडून खड्ड्यांची पाहणी

 

काव्यलेखन आणि सादरीकरण यांचे गुण एकत्रित करून विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. (Pimpri News) कविता पाठविण्याची अंतिम मुदत बुधवार दि.27 जुलै 2022 रोजी आहे. फक्त व्हॉट्सॲपवर टाईप केलेल्या कविता माधुरी विधाटे (भ्रमणध्वनी क्रमांक 7588328469) यांच्याकडे पाठवाव्यात. अधिक माहितीसाठी राजेंद्र घावटे (भ्रमणध्वनी क्रमांक 8888434331) किंवा अश्विनी कुलकर्णी (भ्रमणध्वनी क्रमांक 9309770898) यांच्याशी संपर्क साधावा.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.