Sangvi Crime : विकृतीचा कळस, मादी श्वानाला मारून तिची पिल्ले पळवली

एमपीसी न्यूज – सांगवी (Sangvi Crime) येथे एका मादी श्वानाला मारून तिची नऊ पिल्ले पळवल्याचा विकृत प्रकार घडला आहे. ही घटना 12 जुलै रोजी कृष्णा चौक, नवी सांगवी येथे घडली. सामाजिक संस्थेच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस आला.

साहिल संजय चौधरी (वय 22, रा. पिंपळे गुरव) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि.18 जुलै) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime: फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची प्राणीमल फाउंडेशन नावाची एनजीओ आहे. या माध्यमातून जखमी प्राण्यांवर फिर्यादी उपचार करतात. फिर्यादी पिंपळे गुरव, नवी सांगवी भागातील बेवारस श्वानांना नेहमी अन्न देत असतात. 12 जुलै रोजी फिर्यादी (Sangvi Crime) यांच्या सहकारी महिलेस माहिती मिळाली की, कृष्णा चौकात एक मादी श्वान गंभीर जखमी अवस्थेत आहे. त्यामुळे फिर्यादी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी श्वानाला ताब्यात घेऊन त्यावर उपचार केले. मात्र, उपचारादरम्यान त्या श्वानाचा मृत्यू झाला. कृष्णा चौकात मादी श्वानाने 12 पिलांना जन्म दिला होता. त्यातील नऊ पिल्ले अज्ञाताने पळवून नेली आहेत. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.