Alandi : डंपरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

डंपर चालक अटकेत

एमपीसी न्यूज – आळंदी (Alandi) येथे डंपरने तरुणाला धडक दिली, त्यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. 18 जुलै) सायंकाळी पाच वाजता वडगाव चौक येथे घडला.

अमित विठ्ठलराव देशमुख (वय 19, रा. वडगाव रोड, आळंदी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रमेश विठ्ठलराव रणमोडे (वय 28, रा. लोणी काळभोर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत नारायण सुरोसे (वय 42, रा. चोविसावाडी, च-होली बुद्रुक) याला अटक करण्यात आली आहे.

Pune Crime: फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी सायंकाळी पाच वाजता वडगाव चौक आळंदी येथे रिक्षातून उतरून रस्त्याने जात होते. त्यावेळी आरोपीने त्याच्या तब्यतील डंपर भरधाव वेगात चालवून अमित देशमुख या तरुणाला मागून जोरात धडक (Alandi) दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अमितचा मृत्यू झाला.  आळंदी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.