Pune Crime: फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज: खूनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोन महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी कोंढवा येथे केली. (Pune Crime) उमरअली गफार शेख (वय 20 रा. साईबाबा नगर, कोंढवा) असे अटक आरोपीचे नाव आहे.

 

Hinjewadi Crime: विवाहितेच्या छळाचे हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख व त्याच्या दोन साथीदारांनी 15 फेब्रुवारी रोजी नाना पेठ येथे जफर हकिम याच्यावर कुऱ्हाडीने वार करत जबर जखमी केले होते. (Pune Crime) तेव्हापासून समर्थ पोलिसांना तो गुंगारा देत होता. मात्र पोलीस अंमलदार हेमंत पेरणे यांना खबर मिळाली की,शेख हा त्याचा जुना पत्ता बदलून कोंढवा येथे त्याच्या कुटुंबासोबत भाड्याच्या खोलीत रहात होता. पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो गॅलरीतून पळून जात होता. यावेळी पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला अटक केली.या प्रकरणी पुढील तपास समर्थ पोलीस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.