Pimpri News: वैद्यकीय मनुष्यबळ वाढणार, मानधनावर डॉक्टर, स्टाफ नर्स भरणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांसाठी विविध वैद्यकीय कर्मचा-यांची भरती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे वैद्यकीय मनुष्यबळ वाढणार आहे. मानधनावर डॉक्टर, स्टाफ नर्स कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. काहींच्या मुलाखती झाल्या असून काहींच्या 23 डिसेंबर पर्यंत मुलाखती घेण्यात येणार आहेत.

महापालिकेच्या वतीने शहरामध्ये वैद्यकीय विभागाअतंर्गत थेरगाव रुग्णालय, जिजामाता, मल्हारराव कुटे रुग्णालय आकुर्डी हे नवीन रुग्णालये सुरू करण्यात आली आहेत. तसेच याव्यतिरिक्त यमुनानगर व सांगवी रुग्णालयामधील वैद्यकीय कामकाजासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.

त्यामध्ये क्ष किरण शास्त्रज्ञ 2, टी.बी. अँड चेस्ट फिजिशियन 1, वैद्यकीय अधिकारी 13, स्टाफनर्स 70, सांख्यिकी सहाय्यक 3, प्रयोगशाळा तंत्रज्ञ (लॅब टेक्‍निशियन) 1, एक्स रे टेक्‍निशियन 3, फार्मासिस्ट 7 आणि ए.एन.एम 31 घेण्यात येणार आहेत. त्यामुळे वैद्यकीय विभागातील मनुष्यबळ वाढणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.