Pimpri News : ‘एक सावली तुझी पुरेशी’ गझलसंग्रहाचे प्रकाशन

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – गझलपुष्प संस्थेच्या वतीने गझलकार रघुनाथ पाटील यांच्या ‘एक सावली तुझी पुरेशी’ गझलसंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. चिंचवड मधील पैस रंगमंच येथे शनिवारी (दि.6) हा प्रकाशन सोहळा पार पडला.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. अविनाश सांगोलेकर, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष कवी लेखक राजन लाखे व ज्येष्ठ गझलकार प्रमोद खराडे यांच्या हस्ते या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी दिलासा आणि साहित्य संवर्धन समितीचे अध्यक्ष सुरेश कंक, समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षा शोभा जोशी, स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे, संवेदना प्रकाशनचे नितीन हिरवे, तानाजी एकोंडे, वर्षा बालगोपाल, मीना पाटील, एल्गार साहित्य परिषदेचे अध्यक्ष महेंद्रकुमार गायकवाड, धनंजय भिसे, सारिका माकोडे, मधूश्री ओव्हाळ, कैलास भैरट, किरण पाटील, अंतरा देशपांडे, उज्वला केळकर, सचिन साठे, जयवंत पवार, दिलीप ओव्हाळ, संगीता पाटील, गणेश पवार, शैला पाटील, अशोक पाटील , माधव पाटील आदि उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना डॉ. अविनाश सांगोलेकर म्हणाले, रघुनाथ पाटील यांची गझल माणसाच्या मनाचा ठाव घेते. मिश्किलता अन गंभीरता याचे सुरेख मिश्रण म्हणजे रघुनाथ पाटील यांची गझल.

राजन लाखे म्हणाले, अत्यंत निस्पृह अन सच्चा माणूस ज्यावेळी गझल लिहितो त्यावेळी गझलेतून जे शब्द उमटतात त्यात ईश्वरी अंश आपोआप येतो.

सुत्रसंचलन संदीप जाधव यांनी केले. सूत्रसंचालन समृद्धी सुर्वे यांनी केले. गझलकार प्रशांत पोरे, अभिजित काळे आणि गझलपुष्पच्या सदस्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. निलेश शेंबेकर यांनी आभार मानले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.