Pimpri News: शिवसेनेने संभाजीनगर नामकरणाची कृती करुन दाखवावी – प्रवीण दरेकर

एमपीसी न्यूज – शिवसेनेच्या करणी आणि कथणीत फरक आहे. संभाजीनगरच्या बाबतीत आम्ही काही तडजोड करणार नाही, असे सांगतात. पण, कृती करत नाहीत. शिवसेनेने संभाजीनगर नामकरण करुन कृती करून दाखवावी, असे आव्हान विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेला दिले.

पिंपरीत पत्रकारांशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, औरंगाबाद महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी महापालिकेत ठराव करावा. मंत्रीमंडळात निर्णय घ्यावा. केंद्र सरकारच्या मदतीची आवश्यकता लागल्यास आम्ही पुढाकार घेऊ. केवळ जाहीर करणे, घोषणा करणे यापेक्षा कृतीची आवश्यकता आहे.

भाजप सरकारच्या काळात त्रास झाला असा गौप्यस्फोट पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. त्याबाबत विचारले असता दरेकर म्हणाले, त्यांच्यासारख्या अधिकाऱ्यांकडून अशा प्रकारच्या वक्तव्याची अपेक्षा नव्हती.

राजकारणात सत्ताधारी किंवा विरोधक जाहीररित्या एकमेकांची उणीदुणी काढतात त्याप्रमाणे प्रशासनातील आणि सरकारमधील उणीदुणी बाहेर काढणे शोभा देणारे नाही. अशाप्रकारचे वक्तव्य करणे योग्य नाही. लहाने यांनी चार भिंतींच्या आत बोलायला पाहिजे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.