Pimpri corona Update: शहरात आज 69 नवीन रुग्णांची नोंद, 50 जणांना डिस्चार्ज, 2 मृत्यू

कोरोना लसीकरणाला प्रतिसाद, 6 हजार जणांनी घेतली लस

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाला लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 5943 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 1063 जणांनी लस घेतली आहे. शहराच्या विविध भागातील 69 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली आहे.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 50 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील चिंचवड येथील 61 वर्षीय पुरुष, चिखलीतील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 391 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 96 हजार 619 जण बरे होऊन घरी गेले आहेत.

शहरातील 1809 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 759 अशा 2568 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 602 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 324 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.