Pimpri corona Update: शहरात आज 185 नवीन रुग्णांची नोंद, 38 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – मागील आठ दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. शहराच्या विविध भागातील 180 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा एकूण 185 नवीन रुग्णांची आज (गुरूवारी) नोंद झाली आहे.

तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 38 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील पिंपरीतील 78 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज कोरोनाने मृत्यू झाला. शहरात आजपर्यंत 1 लाख 2417 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 98 हजार 135 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1828 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 771 अशा 2599 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 818 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 785 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत वैद्यकिय क्षेत्रातील 15 हजार 781 जणांनी लस घेतली आहे. आज दिवसभरात 916 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.