Pimpri News : शहरातील मंगळवार, बुधवारचा पाणीपुरवठा विस्कळीत राहणार

एमपीसी न्यूज – रावेत येथील जलउपसा केंद्रातील उच्चदाब वीज संच मांडणीचे अचानक तातडीचे उद्भवले आहे. त्यासाठी उद्या (मंगळवारी) सकाळी 11 ते 12.30 या कालावधी जलउपसा बंद राहणार आहे. त्यामुळे 12 नंतरचा, सायंकाळचा, रात्रीचा तसेच दूस-या दिवशी बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत राहणार आहे.

पिंपरी-चिंचवडकरांना मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पालिका रावेत बंधा-यातून पाणी उचलते. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन शहराला पाणीपुरवठा केला जातो.

जलउपसा केंद्र रावेत येथील पंपगृहांमधील 22 के.व्ही. उच्चदाब वीज संच मांडणीचे अचानक उद्भवलेले उपस्कर वाहिनीचे तातडीचे दुरूस्ती काम करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्या मंगळवारी सकाळी 11 ते 12.30 या कालावधी मध्ये जल उपसा बंद राहणार आहे.

त्यामुळे मंगळवारी दुपारी 12 नंतरचा, सायंकाळचा व रात्रीचा तसेच दूस-या दिवशी बुधवारी सकाळचा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा कमी दाबाने व विस्कळीत होणार आहे.

नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा व जल निःसारण विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे यांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.