Pimpri News : ट्रकमधील सामान पडल्याने जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूकीची कोंडी

एमपीसी न्यूज- ओव्हरलॉडिंगमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या (Pimpri News)  ट्रकमधील सामान रस्त्त्यावर पडल्याने वाहतूकीची कोंडी झाली. दुपारी 1.30 च्या सुमारास जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ही घटना घडली. त्यामुळे बराच वेळ वाहतूकीची कोंडी झाल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या.

 

 

वाहतूक पोलिसांच्या मदतीने  साधारण दीडतासात ही वाहतूकीची कोंडी  मोकळी झाली.

FIH Pro League : भारताने केला जर्मनीचा पराभव

 

ओव्हरलोडिंगमुळे अशा प्रकारच्या  अनेक घटना वारंवार घडत राहतात. तसेच गाडीच्या सस्पेंशन वर दबाव येऊन त्याची क्षमता कमी होते व अपघाताची शक्यता वाढते, म्हणून आवश्यक ती काळजी घेतली पाहीजे व वाहनांच्या (Pimpri News) क्षमते एवढ्याच सामानाचे  लोडिंग करावे, असे वाहतूक पोलिसांकडून वारंवार सांगण्यात येते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.