FIH Pro League : भारताने केला जर्मनीचा पराभव

एमपीसी न्यूज – फेडरेशन इंटरनॅशनल  हॉकी ने चालू केलेल्या प्रो लीग (FIH Pro League) मध्ये भारतीय हॉकी संघ उत्तम कामगिरी करीत आहे. सोमवारी राउरकेला येथील बिरसा मुंडा स्टेडियमवर भारताने आपली चांगली धावसंख्या सुरू ठेवत तीन दिवसांत विश्वविजेत्या जर्मनीला हरवून स्वतःचा स्पर्धेमधला दुसरा विजय नोंदवला.

या विजयासह, हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघ सात सामन्यांतून 17 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.  भारत व स्पेन हॉकी संघाचे गुण समान असले तरी भारत गोल फरकांवर स्पेनच्या पुढे गेला आहे.

 

 

Hinjawadi : लग्न करुन बदला घ्यायचा होता म्हणत सॉफ्टवेअर इंजिनियरकडून पत्नीचा छळ

 

 

टॉम ग्रॅम्बुशने तिसऱ्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरमध्ये गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. याचे उत्तर21 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर मध्ये जुगराज सिंग याने गोल मारून दिला. त्याच्यानंतर अभिषेक, सेलवम कारथी आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग FIH Pro League) यांनीही गोल मारले. सामन्याच्या शेवटी 6-3  असा भारताच्या पक्षामध्ये निकाल लागला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.