Hinjawadi : लग्न करुन बदला घ्यायचा होता म्हणत सॉफ्टवेअर इंजिनियरकडून पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज – प्रेमाचा रंग हा नेहमी सुखद असतोच असे नाही (Hinjawadi) तो क्रुर देखील असू शकतो. नुकताच 2 डिसेंबर 2022 मध्ये फ्रेडी हा कार्तिक आर्यनचा चित्रपट आला होता, ज्यात प्रेमाचा हा विकृतपणा, एक विक्षिप्त मानसिकता दाखविण्यात आली होती. जो सुरुवातीला हिरोईनसोबत प्रेम करतो व नंतर तिचा आतोनात छळ करतो. अशीच एक तक्रार हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. मुळात बदला घेण्यासाठीच लग्न केले हे सांगत एका सॉफ्टवेअर इंजिनीयरने आपल्या उच्च शिक्षीत पत्नीचा आतोनात छळ केला आहे. हा प्रकार 29 एप्रिल 2012 पासून एप्रिल 2022 या कालावधीत मुळशी व चैन्नई तसेच अमोरिका येथे घडला आहे.

 

याप्रकरणी पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.14) तक्रार दिला असून पती थंगराजा, महिला आरोपी, सासरे रामाकृष्णा, दिर रविंद्रन व राजा रामकृष्णा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी थंगराज याचे (Hinjawadi) पीडितेवर प्रेम होते. मात्र पीडितेने त्याच्यासी लग्नाला नकार दिला. अर्थात यात आरोपीचा मेल इगो दुखावला गेला. यातून त्याने एक डोक्यात एक प्लॅन तयार केला. त्याने अगदी पीडितेसमोर प्रेमाची भीक मागितली. प्रसंगी नस कापून लग्नासाठी तिला गळ घातली.

यातून पीडितेने लग्नाला होकार दिला. पुढे लग्न झाले. मुळचा चेन्नईचा असणारा थंगराज अमेरिकेत जॉब करत होता. लग्नानंतर पीडिता त्याच्या सोबत अमेरिकेला गेली अन थंगराज याचे खरे रुप बाहेर आले. पीडितेला शिवीगाळ करत, हाताने मारहाण केली.

तसेच तुझ्याशी लग्न तुझा छळ करण्यासाठी केला आहे. तू मला लग्नाला सुरुवातीला नकार दिला होता त्याचा तुझ्याकडून बदला घ्यायचा आहे, असे म्हणत धमकावले.

तसेच रिती, भाषा येत नाही म्हणत थंगराजच्या घरच्यांनीही सतत टोमणे देणे, अपमानीत करणे, घरातून बाहेर काढत फिर्यादीचा छळ केला. यावरून हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

FIFA : FIFA च्या नव्या नियमांचा भारताला होऊ शकतो लाभ

त्यामुळे प्रेम करताना ते अंधळेपणाने करु नका किंवा भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ न कारण त्याची किंमत पुढे तुम्हालाच चुकवावी लागू शकते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.