FIFA : FIFA च्या नव्या नियमांचा भारताला होऊ शकतो लाभ

एमपीसी न्यूज: फेडरेशन इंटरनॅशनल फुटबॉल असोसिएशन  चार वर्षात  फीफा विश्वचषक स्पर्धा  घेते. या स्पर्धेमध्ये आजपर्यंत बऱ्याच देशांनी सहभाग घेतला आहे.परंतु  भारत आतापर्यंत  या स्पर्धेत  पात्र ठरला नव्हता.  पण आता स्पर्धेचे (FIFA ) नियम बदलले आहेत. 48 संघ, 104 सामने आणि 40 दिवस असे या स्पर्धेचे नवीन नियम आहेत.या नव्या  नियमांचा भारताला लाभ होऊ शकतो.

आत्तापर्यंत फीफा विश्वचषकात फक्त 36 संघच सहभाग घेत होते. तर याच्यामध्ये अशिया खंडातून फक्त चार किंवा पाचच संघ सहभाग घेऊ शकत होते. यामध्ये बऱ्याच वेळा आशियातून सौदी अरेबिया, कोरिया, जपान, इराण इत्यादी संघ  पात्र ठरायचे.

Pimpri : संत तुकाराम नगर मधील फ्लॅटमध्ये लागली आग

भारताने आजपर्यंत फीफा विश्वचषकामध्ये एकही सामना खेळला नाही आहे.1950 च्या फीफा विश्वचषक स्पर्धेत भारत देश  पात्र झाला होता. परंतु तेव्हाही काही कारणास्तव संघ तिथे गेलाच नाही. तेव्हापासून भारत संघ हा कधीही या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी पात्र ठरला नाही.परंतू आता नव्या नियमांमुळे या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांचा आकडा वाढला आहे. अशियातून सुद्धा अधिक संघ सहभाग घेऊ शकतील. या संधीचं भारत सोनं करू शकतो आणि जग पातळीवर भारतीय फुटबॉल संघ हा (FIFA ) नाव कमावू शकेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.