Pimpri News : न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

एमपीसीन्यूज :  कोरोनाच्या प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज शाळा सुरु करण्यासाठी सॅनिटाईजर,मास्क व आवश्यक असणाऱ्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

सरकारनियमानुसार सर्व खबरदारी व उपाययोजनाची पुर्तता केलेली आहे . सर्व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची कोरोना चाचणी (RT-PCR) करण्यात आली.

प्रत्येक विद्यार्थी शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या शरीराचे तापमान मशीनद्वारे तपासण्यात आले. तसेच सर्व वर्ग खोल्या, ऑफिस व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. सोशल डिस्टंसिंग चे पालन करून वर्गात 20-25 विद्यार्थी बसविण्यात आले.

घरात 7-8 महिन्यापासून बसून असल्यामुळे मुलांची शाळेबाबत उत्सुकता वाढली होती. मित्र ,शिक्षक खूप दिवसांनी कधी भेटतील, असे झाले होते . ऑनलाईन शिक्षण घेताना ज्या काही अडचणी आल्या होत्या ते आता शाळेत आल्यानंतर कमी होतील व चांगले दर्जेचे शिक्षण मिळणार आहे.

पालकांनी मुलांना शाळेत पाठवताना कोणतीही खंत बाळगू नये . शाळांनाही मुलांची काळजी आहे” असे शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पलता डीक्रूझ म्हणाल्या.

सर्व मुलांचे गुलाबाचे फुल देऊन सकाळी स्वागत करण्यात आले. व सर्व मुलांना, शिक्षकांना, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सॅनिटाईजर व मास्क संस्थेतर्फे देण्यात आले .

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.