_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pimpri : फडणवीसांच्या जीवावर पोपटासारखे बोलणाऱ्या पडळकरांनी टीका करताना स्वतःची लायकी तपासावी  : संजोग वाघेरे पाटील यांचे टीकास्त्र

Padalkars who speak like parrots on the life of Fadnavis should check their own merits while criticizing: Sanjog Waghere Patil's Tikastra

एमपीसीन्यूज : धनगर समाजाच्या आरक्षणावरून भाजपने आमच्या बापाचा अपमान केला म्हणत लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकर यांना वंचित आघाडीतून वंचित रहावे लागले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत ज्याच्या हातून गळ्यात पट्टा घालून अजित दादांंसमोर दंड थोपटले, त्याहीवेळी बारामतीकरांनी त्यांना त्याची लायकी दाखवली. तर पवार साहेबांचं राजकारण संपलं, असे म्हणणाऱ्या फडणवीस यांनाही पवारसाहेब बापमाणूस आहेत, याचा साक्षात्कार झाला. त्या फडणवीसांच्या जीवावर पोपटासारखे बोलणाऱ्या पडळकर यांनी स्वतःची लायकी तपासून टीका करावी, असा जबरदस्त हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना नुकतेच आमदार झालेले गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत असल्याचे विधान पडळकर यांनी केले.

मात्र, पडळकर यांनी स्वतःची राजकीय उंची न तपासताच राज्यातील ज्येष्ठ नेत्याबद्दल, अशी वक्तव्य करताना स्वतःच्या राजकीय उंचीची कल्पना पूर्ण महाराष्ट्राला आणून दिली.

शरद पवार यांच्याबद्दल असं बोलायची महाराष्ट्रातील विरोधकांची देखील हिंमत होत नाही. पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेल्या देवेंद्र फडणवीस  त्यांना सत्तेची हवा डोक्यात घुसली.

त्यामुळे त्यांनी पवार साहेबांचं राजकारण संपलं असे म्हणत विधानसभा निवडणुकीत प्रचार केला.

_MPC_DIR_MPU_II

हा प्रचार महाराष्ट्राच्या शेतकरी राजा, नवीन युवक व माता-भगिनींना रुचला नाही आणि नियतीने फडणवीस यांच्यापासून मुख्यमंत्र्याची खुर्ची हिरावून घेतली. त्यांनाही  आपण मुख्यमंत्री झालो नाही याची सल नेहमी टोचत आहे.

तीच सल अजित पवारांशी विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त करून स्वतःची लायकी समजलेल्या पडळकर त्यांची झाली आहे, अशी टीका वाघेरेे यांनी केली आहे.

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून उदयास आलेल्या पडळकर यांना बारामतीमधील धनगर समाजाने त्यांची जागा दाखवून दिली आहे.

त्यांना फक्त धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नाचं राजकारण करायचं आहे. ज्या भाजपात ते सध्या आश्रयी आहेत, त्या भाजपाने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देतो, असे जाहीर केले होते.

त्यांनी पाच वर्षे धनगर समाजाला खेळवलं. आता सत्तेवरून गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या विरोधात व ज्यांच्यावर बोलण्याची लायकी नाही त्यांच्यावर टीका करण्यास नव्या वाचाळवीर पडळकर यांना माध्यमांसमोर उलटसुलट प्रतिक्रिया देत आहेत.

त्यामुळे ज्यांच्या गळ्यातील पट्टा घातला आहे त्या भाजपने त्यांच्या समाजासाठी काय केले याची माहिती तपासावी, असा प्रतिसवाल संजोग वाघेरे पाटील यांनी भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.