Pimpri : पार्थ पवार यांच्या कळंबोली दौ-यात विविध विषयावर चर्चा

एमपीसी न्यूज – मावळ मतदार संघाचे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी नुकताच कळंबोली येथे प्रचार केला.

त्यांनी कळंबोली येथील मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समितीला भेट दिली. तेथील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समितीचे सभापती गुलाबराव जगताप, आमदार बाळाराम पाटील, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सातारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे आदी उपस्थित होते.

कळंबोली येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बैठकीत चर्चा झाली. या वेळी मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत,जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण,तालुका अध्यक्ष अविनाश पडवळ, मनसे शहराध्यक्ष अमोल बोचरे,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अक्षय काशीद व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.