Pimpri : दुर्मिळ आणि जातीवंत श्‍वानांच्या ऐटबाज रुबाबाची पिंपरी-चिंचवडकरांना भूरळ

रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने आयोजित डॉगथॉन शो स्पर्धा उत्साहात

एमपीसी न्यूज – लाईट.. कॅमेरा.. ऍक्शन असे शब्द केवळ माणसांच्या सौंदर्य स्पर्धेतच ऐकायला मिळतात असे नाही. प्राण्यांच्या स्पर्धेतही आता हे शब्द ऐकू येऊ लागले आहेत. नुकतेच हे शब्द पिंपरी-चिंचवडकरांच्या कानी पडले. रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने डॉगथॉन स्पर्धा झाली. लॅब्रेडॉर रेट्रीव्हर, पग, बॉक्स्र, बिगल, जर्मन शेफर्ड, चिव्हाव्हा, रॉट व्हिलर, ग्रेटडेन, बर्फाळ प्रदेशातील सायबेरियन हास्की, सेंट बर्नाड, माऊंटन डॉग, उंदरा इतका दिसणारा चुवावा व पॉकेट पाम डॉग, सेंट बर्नाड, बुलडॉग, जेक रसेल टेरियर, बिचॉन फ्रिसे आदी दुर्मिळ व जातिवंत श्‍वानांनी आपल्या ऐटबाज रुबाबांनी पिंपरी-चिंचवडकरांना भूरळ घातली.

निमित्त होते रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण आयोजित डॉगथॉन शो स्पर्धेचे. निगडी प्राधिकरण येथे डॉगथॉन शो पाहण्यासाठी रविवारी श्‍वानप्रेमींनी गर्दी केली होती.

  • सकाळी 7 वाजल्यापासूनच संपूर्ण परिसर गर्दीने फुलून गेला. आबालवृद्धांची खचाखच गर्दी झाली होती. डॉगथॉन शो पाहण्यासाठी येणारा प्रत्येकजण श्‍वानांच्या जवळ जाऊन प्रेमाने कुरवाळून त्यांचे फोटो मोबाईल, कॅमेरामध्ये टिपत होता. काहींनी श्‍वानासोबत सेल्फीही काढला. येथे श्‍वानांसाठी लागणारे विविध साहित्यांचे स्टॉल उभारलेले होते.

या डॉगथॉन शो स्पर्धेत बेस्ट ग्रुमिंगमध्ये आदित्य भोपे. सिम्बा (गोल्डन रिट्रॅव्हर), मॅक्स ग्रेटडेन (मालक अद्वैत करंदीकर). फॅशन शोमध्ये श्रध्दा अन्जेंल (यॉर्कशेरी), मेबल अंन्थोनी– लिओ (ल्हासा अप्सो), नयन शिरसठ (चिनहुआहुआ), जेनी (ल्हासा अप्सो), आकांक्षा ग्रोव्हर. फॅशन शोमध्ये लार्ज ब्रीड, अभिषेक पिल्ले (लॅब्रोडोर) यांनी बक्षिसे मिळविली.

  • डॉग ओबिटिएंट शो देखील झाला. विविध प्रकारची बक्षिसे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमापासून मिळणार निधी हा कामशेत जवळील नेसावे या गावाच्या विकासकामासाठी देण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षा वैजयंती आचाय यांनी, दरवर्षी डॉगथॉन शोचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या अध्यक्षा वैजयंती आचार्या, नियोजित अध्यक्ष बहार शहा, सतीश आचार्य, रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष सदाशिव काळे, व सर्व रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे सदस्य उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.