Maval : पनवेलमध्ये घुमला ‘खिंचके ताण धनुष्यबाण’चा नारा

एमपीसी न्यूज- पनवेल येथे शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीच्या बैठकी पार पडल्या. बैठकीत ‘महायुतीचा विजय असो’, ‘खासदार श्रीरंग बारणे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘खिंचके तान धनुष्यबाण’च्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. पनवेल मधील तळोजा मजकूर, खारघर, कळंबोली, कामोठे, खांदा कॉलनी, शिवाजी चौक आदी ठिकाणी बैठकी झाल्या.

कळंबोलीतील सभेसाठी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौटमल, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, बबनदादा पाटील, रामदास पाटील, प्रल्हाद केणे, परेश पाटील, विनोद गरड, संतोष भोईर, बाळासाहेब पाटील, नगरसेवक अमर पाटील, विद्या गायकवाड, बबन पाटील, राजू शर्मा, संपर्क प्रमुख दत्ता दळवी, किशोरी पेडणेकर, सभागृह नेते परेश ठाकूर, रवी ठाकूर, अरुण भगत,रामदास शेवाळे, अरुण भगत, कल्पना राऊत, रामजी बेहरा, आरती नवघरे, अनिता पाटील, नेत्रा पाटील, हर्षदा उपाध्याय, अभिमन्यू पाटील, कुंदा मेंगडे, ब्रिजेश पटेल, दीपक शिंदे, गीता चौधरी, दिलीप जाधव, साधना पवार, मीना घोगरी, लकवीर सिंग सैनी, संजय मुळीक, प्रभाकर बांगर, राजेंद्र मांजेरकर, अजय माळी, कीर्ती नवघरे, माधव भिडे, शिरीष भुतडा आदी उपस्थित होते.

मावळ लोकसभेची जागा महायुतीच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे. शिवसेनेकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतदारांनी धनुष्यबाण च्या चिन्हासमोरील बटण दाबून महायुतीच्या उमेदवाराला जिंकून देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांकडून ‘खिंचके तान धनुष्यबाण’ अशी घोषणा देण्यात आली. यामुळे परिसर दणाणून निघाला. बैठकीत शीख समाजाच्या वतीने खासदार बारणे यांना पाठिंबा असल्याचे जाहीर करण्यात आले. शीख समाजाकडून खासदार बारणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, महापौर डॉ. कविता चौटमल, उपमहापौर विक्रांत पाटील, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, बबनदादा पाटील, अरुण बागल यांची यावेळी भाषणे झाली. कामाच्या जोरावर मतदारांना जिंकायचं आहे. विजयी गुलाल उधळून धुळवड साजरी केली जाणार आहे. काँग्रेसचे सरकार असताना शत्रू राष्ट्रांनी हल्ले केले. त्यावेळी त्यांनी केवळ शाब्दिक निषेध व्यक्त केला. मात्र नरेंद्र मोदी सरकारने अशा वेळी शाब्दिक निषेध व्यक्त करत जशास तसे उत्तर दिले. जनमानसात पोहोचण्यासाठी विरोधक रिक्षात बसतात. पण खासदार बारणे यांना हे जनमाणसाच्या मनात बसलेले आहेत, त्यामुळे त्यांना अशा प्रकारची स्टंटबाजी करण्याची गरज नाही, असे म्हणत; नरेंद्र मोदी हे विकासाचा विचार आहे. नागरिकांनी विकासाच्या विचाराला मत देऊन देशाच्या प्रगतीमध्ये भर घालावी, असे आवाहन देखील बैठकीत करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.