Pimpri : पिंपरी चिंचवड शहरात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 80 मंडळांवर गुन्हे; 71 तळीरामांवर कारवाई

एमपीसी न्यूज – गणेश उत्सव नुकताच संपन्न झाला. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी सर्वच गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूक काढली. मिरवणुकीत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे वाजविण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे बहुतांश मंडळांनी ढोल ताशा, सनई चौघडा आणि बँजो अशा वाद्यांना पसंती दिली होती. काही मंडळांनी नियमांना बाजूला सारत मोठ्या आवाजात वाद्ये वाजवली. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत कमाल मर्यादेपेक्षा अधिक आवाज करणाऱ्या 80 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर गणेश विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन आलेल्या 71 जणांवर कारवाई करण्यात आली.

गुन्हे दाखल झालेली मंडळे –
पिंपरी – 18
भोसरी – 10
चाकण – 12
हिंजवडी – 04
वाकड – 23
सांगवी – 13

कारवाई झालेले तळीराम –
पिंपरी – 36
चिंचवड – 01
चाकण – 13
वाकड – 02
सांगवी – 01
देहूरोड – 10
तळेगाव दाभाडे 08

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.