Pimpri : पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून मणिपूर मधील घटनेचा निषेध

एमपीसी न्यूज – मणिपूर येथे दोन समाजातील वादातून एका समाजाने (Pimpri) दुसऱ्या समाजातील दोन महिलांची धिंड काढली. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जात आहे. पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनकडून देखील या घटनेचा निषेध करण्यात आला.

Chinchwad : वेदनांना सुगंधित करण्याचे सामर्थ्य  साहित्यात – गिरीश प्रभुणे

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष ॲड. जयश्री कुटे, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सुशील मंचरकर, ॲड. सुजाता बिडकर , ॲड. संगीता परब, ॲड. पूनम राऊत यांनी निषेध व्यक्त केला.

यावेळी ॲड. उमेश खंदारे, ॲड. गजेंद्र तायडे, ॲड. मेरी रणपिसे, ॲड. धनंजय कोकणे, ॲड. साठे, सचिव ॲड. गणेश शिंदे, ऑडिटर ॲड. राजेश रणपिसे, सदस्य ॲड. सौरभ जगताप, ॲड. प्रशांत बचुटे, आजी माजी पदाधिकारी व वकील उपस्थित होते.

मणिपूर मध्ये मैतयी आणि कुकू समाजात सध्या वाद सुरु आहे. हा विकोपाला जाऊन मैतयी समाजाकडून कुकू समाजातील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढली. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.

त्यानंतर देशभरातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील यावर दुःख व्यक्त केले.

या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन व्हावे. तसेच अशा घटना कुठेही घडणार नाहीत, याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात (Pimpri) आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.