Pimpri: ‘बायसिकल शेअरिंग’ आठवड्याभरात सुरू होणार

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात ‘बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून पिंपळेगुरव व पिंपळेसौदागार भागात वेगवेगळ्या चार सायकल कंपन्यामार्फत 45 ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम आठवड्याभरात सुरू केला जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर व परिसरात ही योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या योजनेकरिता नाममात्र दरात सायकली उपलब्ध करुन देण्याची यूलू, पेडल, मोबीसाईल आणि मोबिक या चार सायकल कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. आयुक्त कार्यालयात पार पडलल्या बैठकीला या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी 200 सायकली उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली आहे. याकरिता प्रति तास नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. हे भाडे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे.

नागरिकांनी कमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पिंपळे सौदागरमधील बीआरटीएस मार्गालगत महापालिका प्रशासनाने सायकल उभ्या करण्यासाठी केवळ जागा उपलब्ध करुन द्यावयाची आहे. याशिवाय अनेक उच्चभ्रू सोसायट्यांच्या आवारात सायकली उभ्या करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ही बाब या सोसायट्यांच्या अखत्यारितील आहे.

पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव परिसरातीत वेगवेगळ्या चार सायकल कंपन्यामार्फत तब्बल 45 ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम आठवड्याभरात सुरू केला जाईल, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. तसेच पादचार्‍यांसाठी विशेष मार्ग विकसित केले जात आहे. त्या संदर्भात नुकताच आकुर्डीत नागरी संवाद घेण्यात आला. दुसरा नागरी संवाद पिंपळेसौदागर येथे घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.