Pimpri : हैद्राबाद एक्सप्रेसच्या धडकेत युवकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पायी लोहमार्ग ओलांडत असताना हैद्राबाद एक्स्प्रेसने उडवल्याने एकाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (बुधवारी) सकाळी साडे नऊच्या सुमारास पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ झाला.

अपघातात चेहरा पूर्णपणे विद्रुप झाल्याने तसेच कोणतीही कागदपत्रे न सापडल्याने मृताची ओळख पटू शकली नाही.

मृताचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे. रंग गोरा, उंची 5 फूट 5 इंच, बांधा सडपातळ, केस काळे असे वर्णन आहे. हिरव्या काळ्या उभ्या रेषांची नक्षी असणारा पूर्ण बाह्यांचा शर्ट, सॅन्डो बनियन, राखाडी रंगाची पॅन्ट असे कपडे त्याने घातले होते. या वर्णनाच्या व्यक्तीबाबत कोणत्याही स्वरूपाची माहिती असल्यास पिंपरी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे अवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.