Kasarwadi Crime News : रेल्वेच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – धावत्या रेल्वेखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 23) सकाळी पावणे आठ वाजताच्या सुमारास कासारवाडी रेल्वे स्टेशनजवळ घडली.

मृत व्यक्‍तीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे आहे. त्याने अंगात निळ्या-हिरव्या रंगाचा चौकडी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातली आहे. चेहरा गोल, उंची पाच फूट दोन इंच, अंगाने मजबूत असे मयत व्यक्‍तीचे वर्णन आहे.

या व्यक्‍तीबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पिंपरी रेल्वे पोलीस चौकीशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.