Pimpri : सुदृढ पिढीसाठी गोवर व रुबेला लसीकरण करण्यांचे महापौरांचे आवाहन

एमपीसी न्यूज – सुदृढ व सक्षम पिढी घडविण्यासाठी गोवर व रुबेला लसीकरण बालकांना करुन घ्यावे असे मत महापौर राहूल जाधव यांनी व्यक्त केले.भारत सरकारत्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. त्याचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी साई जीवन प्राथमिक शाळा, जाधववाडी चिखली येथे झालेल्या कार्यक्रमास नगरसेविका अश्विनी जाधव, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, महिला वैद्यकीय अधिकारी  डॉ. वर्षा डांगे,  प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे, प्रभारी वैद्यकीय.अधिकारी डॉ. सुनीता साळवे, लायन्स क्लबचे डॉ. ललित धोका, पंडीत जाधव, गुलाब जाधव, मुख्याध्यापक शशिकांत गायकवाड उपस्थित होते.

महापौर पुढे म्हणाले की, मुल व मुलींच्या भविष्याच्या आरोग्यासाठी गोवर रुबेला लस खूप महत्वाची आहे. भविष्यात येणा-या आजारांपासून संरक्षण मिळविण्यासाठी गोवर रुबेला लस पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्वांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अण्णा बोदडे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. वर्षा डांगे यांनी केले. आभार डॉ. पवन साळवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.