BNR-HDR-TOP-Mobile

Chinchwad : मधुकर बच्चे यांच्या जनजागृतीमुळे गोवर-रुबेला लसीकरणास प्रतिसाद

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज –  चिंचवडगावातील तालेरा हॉस्पिटल येथे  रुबेला व गोवर लसीकरण मोहीम राबविण्यात आली होती. तालेरा हॉस्पिटलच्या वैदयकीय अधिकारी डॉ. गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरणाची सुरवात करण्यात आली होती.

या लसीकरण शिबिरास महाराष्ट्र महावितरण सदस्य मधुकर बच्चे, भाजपा पुणे जिल्हा रोजगार आघाडी अध्यक्ष सौरभ शिंदे, भाजपा सरचिटणीस अजित कुलथे, प्रभाग अध्यक्ष गणेश बच्चे, मनोज तोरडमल, धनंजय शाळीग्राम, दीपक नागरगोजे, राहुल शिंदे, काका मुंडे, गिरीश हंपे, सुनील कुलकर्णी, राजू कोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

लसीकरणाचा पहिलाच दिवस आसल्यामुळे व महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी परिसरातील नागरिकांना रुबेला व गोवर या आजराबाबत गेल्या दहा दिवसांपासून विविध प्रकारे जनजागृती केल्यामुळे प्रभागातील व शहरातील नागरिकांनी आपल्या मुलांना घेऊन मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभाग घेतला. अक्षरशा पालकांनी बाळांना घेऊन मोठ्या रांगा लावल्या होत्या परंतु, हॉस्पिटलमधील स्टाफने खूप छानरित्या नागरिकांना, बाळांना त्रास होणार नाही, वेळ जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली असल्याचे बच्चे यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

.