Pimpri : टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनच्या अध्यक्षपदी सचिन लांडगे, कार्याध्यक्षपदी अशोक माने तर, जनरल सेक्रेटरीपदी संतोष दळवी

एमपीसी न्यूज – टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियन, पुणेच्या 31 नवनिर्वाचित प्रतिनिधींमधून युनियनचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी पदासाठी गुप्तमतदान पध्दतीने निवड करण्यात आली.

या निवडणुकीमध्ये सर्वश्री सचिन लांडगे यांची अध्यक्ष तर, कार्याध्यक्ष अशोक माने व जनरल सेक्रेटरी संतोष दळवी यांची गुप्तमतदान पध्दतीने निवड करण्यात आली. युनियनच्या सर्व नवनिर्वाचित 31 प्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला व ही निवड प्रक्रिया आज संपन्न झाली.

  • टाटा मोटर्स एम्पलॉईज युनियन, पुणेच्या निवडणुक समितीने ह्यांचे संपूर्ण कार्य अत्यंत कुशलपणे संपन्न केले. युनियनच्या निवडणुक समितीमध्ये सर्वश्री विजय सुदर्शनी (अध्यक्ष), अशोक नरोडे (उपाध्यक्ष), प्रवीण भावसार, किरण टकले, मदन कलंगे, गुणाजी परब, भालचंद्र गोसावी व इस्माइल मुल्ला यांनी काम संपन्न केले. शनिवार दि. 22 जूनला युनियनच्या निवडणुका झाल्या होत्या.

या निवडणुकीमध्ये एकंदर 6500 मतदारांनी भाग घेतला. 155 उमेदवार रिंगणात होते व त्यापैकी 31 उमेदवार विजयी झाले व त्यानंतर आज अध्यक्ष, कार्याध्यक्ष व जनरल सेक्रेटरी पदाची निवड गुप्तमतदान पध्दतीने करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.