Pimpri : घरात अडकलेल्या एक वर्षाच्या बाळाची सुखरूप सुटका

एमपीसी न्यूज – घरात खेळता खेळता आतून कडी ( Pimpri) लागल्याने घरात अडकलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. ही घटना मंगळवारी (दि. 12) सायंकाळी सात वाजताच सुमारास विश्वरत्न कॉलनी संत तुकाराम नगर येथे घडली.

लक्ष लखन अहिरेकर (वय 1 वर्ष 2 महिने) असे सुटका केलेल्या चिमुकल्या मुलाचे नावे आहे.

Pune : जिल्हाधिकाऱ्यांनी ओला-उबर कंपन्याचा अर्ज केला नामंजूर

अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास विशाल ढोंबले यांनी प्रत्यक्ष मुख्य अग्निशमन केंद्र येथे येऊन माहिती दिली की, विश्वरत्न कॉलनी संत तुकाराम नगर येथे एक मुलगा घरामध्ये अडकला आहे. त्यानुसार मुख्य अग्निशमन केंद्रातून लिडींग फायरमन सारंग मंगरूळकर, फायरमन भूषण येवले, वाहन चालक दत्तात्रय रोकडे, ट्रेनी फायरमन सिद्धेश दरवेस, प्रतीक खांडगे, संदीप डांगे, समीर पोटे, अक्षय आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी हेलिगण टूलच्या साहाय्याने दरवाजा उघडून लहान बाळाची सुखरूप सुटका करून त्याला आईच्या ताब्यात दिले. मुलगा घरात एकटा खेळत होता. त्याची आई बाहेर काम करत असताना मुलाकडून खेळता खेळता घराला आतून कडी लागली गेली आणि तो आतमध्ये अडकला ( Pimpri) होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.