Pimpri : पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज – अक्षरग्रंथ या संस्थेतर्फे 22 एप्रिलपासून चिंचवडगावातील गोखले हॉल येथे आयोजित (Pimpri) केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या प्रदर्शनात वीस नामवंत प्रकाशनाच्या सुमारे दहा हजार पुस्तकांचा समावेश आहे.

यामध्ये कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र, पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक, पाकशास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, आरोग्य, अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारातील मराठी भाषेतील प्रथितयश आणि नवोदित लेखकांच्या नव्या अन् जुन्या पुस्तकांचा समावेश आहे.

Pimpri : ‘मन की बात’च्या ऐतिहासिक 100 व्या कार्यक्रमाची भाजपकडून जय्यत तयारी

त्यामुळे सर्व वयोगटातील वाचकांनी प्रदर्शनाला भेट दिली असून विशेषतः शालेय सुट्टी सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय (Pimpri) आहे. सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत खुले असलेल्या या प्रदर्शनाचा 1 मे रोजी शेवटचा दिवस आहे, अशी माहिती चित्रसेन गोलतकर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.