Pune : सिंबायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी तर्फे स्किल्याथॉन 2023 उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंग या (Pune) विद्याशाखेअंतर्गत स्किल्याथॉन 2023 या प्रकल्प स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील दोन दिवशीय प्रकल्प स्पर्धेचे उदघाटन मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्रौद्योदिकी संस्थेच्या ( एमएनएनआयटी) मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्राध्यापक रवी प्रकाश यांच्या हस्ते किवळे येथे करण्यात आले.

यावेळी एसएसपीयुच्या मेकॅट्रॉनिक्स इंजिनीअरिंगच्या विद्याशाखेचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. स्किल्याथॉन हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांवर आधारित घेण्यात आला असून यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील पोस्टर बनविणे स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरील विविध महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.

एसएसपीयुच्या स्कूल ऑफ मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचे संचालक अकबर अहमद यांनी स्किल्याथॉनच्या उदघाटनाप्रसंगी म्हणाले की, “संयुक्त राष्ट्रांनी शाश्वत विकास उद्दिष्टांद्वारे मांडलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात . याचाच एक भाग म्हणून स्कूल ऑफ मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंगतर्फे स्किल्याथॉन हा उपक्रम राबवण्यात आला असून यात अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित असलेल्या 15 पैकी 9 संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा समावेश होता.

एमएनएनआयटीचे प्राध्यापक रवी प्रकाश यांनी स्किल्याथॉनचे आयोजन केल्याबद्दल एसएसपीयुचे कौतुक केले. शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रत्येकजण कसा योगदान देऊ शकतो तसेच भविष्यात ऊर्जा व्यवस्थापन आणि पर्यायी उर्जेशी संबंधित करिअर घडू शकते. या संदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन केले.

Pimpri : ‘मन की बात’च्या ऐतिहासिक 100 व्या कार्यक्रमाची भाजपकडून जय्यत तयारी

आपल्या उद्घाटन भाषणात ते म्हणाले की, “अलीकडील काळात माहिती तंत्रज्ञान आणि संगणक विज्ञानावर आधारित नोकऱ्यांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक प्रमाणात आहे. तसेच येणाऱ्या काळात ऊर्जेचा वापर लक्षात घेता आणि हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी, पर्यायी ऊर्जा आणि ऊर्जा व्यवस्थापनाशी (Pune) संबंधित नोकऱ्यांमध्ये वाढ होईल.” असे वक्तव्य त्यांनी व्यक्त केले. स्किल्याथॉनच्या माध्यमातून एसएसपीयुतर्फे विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये आत्मसात करण्यास एक उत्तम व्यासपीठ करून देण्यात आले होते. तसेच या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना वास्तविक-जगातील विविध कल्पना आणि विविध समस्यांचे निराकरण करण्यास मदत झाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.