Pimpri : शब्दधन काव्यमंचच्या अध्यक्षपदी सुरेश कंक यांची निवड

एमपीसी न्यूज – शब्दधन काव्यमंच या संस्थेची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश कंक यांची निवड करण्यात आली. 

पिंपरी चिंचवड परिसरातील साहित्य क्षेत्रात 18 वर्षे कार्यरत असलेल्या शब्दधन काव्यमंच संस्थेची नवीन कार्यकारिणी ज्येष्ठ साहित्यिका शोभा शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी सुरेश कंक यांची तर सचिवपदी माधुरी विधाटे यांची निवड करण्यात आली.

संस्थेची कार्यकारिणी पुढीलप्रमाणे – सुरेश कंक (अध्यक्ष) प्रकाश घोरपडे (कार्याध्यक्ष), सुभाष चव्हाण (उपाध्यक्ष), माधुरी विधाटे (सचिव), संगीता झिंझुरके (उपसचिव), मधुश्री ओव्हाळ (कार्यवाह), तानाजी एकोंडे (कोषाध्यक्ष), अरुण परदेशी (सहकोषाध्यक्ष)
तसेच सल्लागार म्हणून श्रीकांत चौगुले, शंकरशेठ जगताप, शिवाजीराव शिर्के यांची तर सदस्य म्हणून अनिल दीक्षित, भाऊसाहेब गायकवाड, मुरलीधर दळवी, उमेश सणस, नंदकुमार कांबळे, शरद शेजवळ, बाळासाहेब घस्ते, आय.के.शेख, शामराव साळुंखे, अण्णा गुरव यांची निवड करण्यात आली.

  

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.