Pimpri: कोरोनाचे रुग्ण सापडल्याने शहरातील ‘हे’ भाग आजपासून ‘सील’

'This' part of the city will be 'sealed' from today as corona patients are found

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आनंदनगर, वाल्हेकरवाडी,  रुपीनगर,  बौद्धनगर,  महात्मा फुलेनगर,  भीमनगर,  च-होली, सांगवी,  नेहरूनगर,  दापोडी  परिसरात आज (शुक्रवारी)  कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे महापालिकेने या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे.

शहरातील ज्या भागात कोरोनाचे रुग्ण सापडतील.  तो भाग महापालिकेकडून सील केला जातो. नेहरूनगर, पिंपरी परिसरात आज पुन्हा कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.

आज सील केलेले भाग !

सिद्धार्थ बिल्डिंग, अजंठानगर येथील (अमृतकृपा हौसिंग सोसायटी-ट्रान्सपोर्ट कॉर्पो ऑफ इंडिया-विनोद व्हरायटी),

कुलदीप अंगण नेहरूनगर येथील  (तरटे किराणा दुकान-लक्ष्मी टेफ्लोक्स-कुलदीप अंगण सोसायटी-अमिर चिकन सेंटर),

सोनकर चेंबर्स- पिंपरी येथील (गरीब नवाब हॉटेल-गर्ग प्रोव्हिजन स्टोअर्स-नानल हॉस्पिटल)

हा परिसर आज रात्री 11 वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत सील करण्यात येत आहे.

या परिसरात प्रवेशबंदी आणि परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी केली आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.